संवादाता ब्रिजेश बड़गुजर: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या २०२३-२४ दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी १३ मे रोजी जाहीर करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमधील परीक्षेला बसलेले शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. परीक्षेला एकूण ११९ विद्यार्थी बसले होते. दहावीतील सिद्धी मावळंगकर हिला ९६.४० टक्के गुण मिळवून ती विद्यालयामध्ये प्रथम आली आहे. आरोही सुतावानी (९५.८०),कृष्णा काळे (९५.२0),सिद्धेश सावंत (९४.४०), यश शर्मा (९४.२०) हे सर्व अव्वल ठरलेले विद्यार्थी आहेत. विद्यालयातील एकूण १९ विद्यार्थ्यांना ९०% हून अधिक गुण मिळाले आहेत ,तर २९ विद्यार्थी हे ८० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक माननीय श्री.अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहून अभ्यास कसा करता येईल याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.मृदुला गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा आणि समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि याचे फलस्वरूप आज विद्यालयाचा निकाल हा १०० टक्के लागलेला आहे. याचे श्रेय मुख्याध्यापिकांनी शाळेचे संस्थापक,सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेले आहे. माननीय श्री.अमित गोरखे, विश्वस्त श्री. विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.