संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
सर्व्हे न.२१,मौजे थेरगाव,सर्व्हे न २१ , २२ याठिकाणी मे सोनिगरा यांचेकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक झालेबाबत कारवाई करणेबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी दि २१/१२/२०२३ रोजी लेखी तक्रार केलेली होती. २१/१२/२०२३ रोजी तक्रार दिलेले असताना तब्बल २० दिवसांनी पंचनामा करण्यात आला. तसेच १०/०१/२०२४ रोजी पंचनामा झालेला असताना पुढील सुनावणी संदर्भात तक्रारदार सिद्दिक शेख यांना कसलीही कल्पना देण्यात आलेली नाही. सर्व्हे न २१ , मौजे थेरगाव , सर्व्हे न २१ , २२ याठिकाणी मे सोनिगरा यांचेकडून अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक झालेबाबत कारवाई करणेबाबत जाणीवपूर्वक मा. तहसीलदार कार्यालयाकडून प्रचंड टाळाटाळ व दिरंगाई होत असल्याने दि ६/०८/२०२४ रोजीच्या पत्रान्वये तहसीलदार कार्यालय येथे ” लाच दो आंदोलन ” करण्याबाबत कळविण्यात आलेले होते . त्यानुसार आज मुळशी तहसील कार्यालय येथे प्रतीकात्मक ” लाच दो आंदोलन ” करण्यात आले .
यावेळी आंदोलकांनी प्रतीकात्मक तहसीलदारची नोटांचा हार घालून मिरवणूक काढण्यात आली. तसेच १ कोटी रुपयांचा प्रतीकात्मक धनादेश सुपूर्द केला.यावेळी नायब तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई केलेबाबतचे लेखी पत्र संघटनेला दिले .आंदोलनावेळी अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी सांगितले कि, तहसीलदार यांनी मे सोनिगरा यांना १ कोटी ८७ लाख रुपयांचा दंडात्मक आदेश काढला आहे परंतु हा सर्व बनवाबनवीचा प्रकार असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे,कारण २५/०७/२०२४ च्या आदेशाचे अवलोकन केले असता त्यामध्ये एकूण अनधिकृत गौणखनिज उत्खनन ९६८९ नमूद केलेलं असून ५००० ब्रास साठी परवानगी घेतल्याचे सांगितले आहे,परंतु या परवानग्या नियमानुसार ग्राह्य धरता येत नाहीत.
हा निव्वळ डोळ्यात धूळफेक करणायचा प्रकार आहे . कारण या ठिकाणी एकूण ६ इमारतींचे बांधकाम चालू होते,परंतु तहसील कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे करोडोंचा महसूल बुडालेला आहे . यावरून तहसील कार्यालयामार्फत मे सोनिगरा यांना पाठीशी घातले जात असल्याचे सिद्ध होत आहे.तसेच यापूर्वी ५ इमारतीच्या गौणखनिज उत्खनन बाबत सुद्धा कसलीही कारवाई करणेत आलेली नसलेने जाणीवपूर्वक बिल्डरच्या नियमबाह्य व चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणाऱ्या तहसील कार्यालयातील संबंधित अधिकारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचेवर कारवाई करणेत यावी,तसेच मे सोनिगरा यांच्यावर दंडात्मक कारवाईचा सुधारित आदेश काढण्यात यावा.तसेच मे सोनिगरा यांनी शपथपत्रात खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केलेप्रकरणी त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेत यावा .
यावेळी तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार डॉ.प्रियांका मिसाळ यांनी आंदोलकांशी चर्चा केली व सुधारित आदेश काढण्याचे आश्वासन दिले . यावेळी अपना वतन संघटनेचे कार्याध्यक्ष राजू शेरे,सचिव दिलीप गायकवाड,महिलाध्यक्ष राजश्री शिरवळकर,शहर प्रभारी जितेंद्र जुनेजा,बंटी बुचडे,विकास पांडागळे,कय्युम पठाण,शिवशाही व्यापारी संघाचे अध्यक्ष युवराज दाखले,दिनेश भाऊ चव्हाण,फातिमा अन्सारी,तौफिक पठाण,वसिम पठाण,मलंग शेख,लक्ष्मण पांचाळ,संदीप कोल्हे आदीजण उपस्थित होते.