संवाददाता ब्रिजेश बडगुजर: पुणे जिल्ह्यातील तळेगाव वराळे येथे घडलेल्या अमानवी व दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “आझाद समाज पार्टी” चे महाराष्ट्र लीगल अध्यक्ष अँड तौसीफ शेख यानी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी रात्री तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेचा तपास तत्काळ पूर्ण करून आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी याबाबत चर्चा करण्यात आली.तसेच पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून राज्य सरकारने विशेष लक्ष देऊन प्रकरण हाताळावे व पीडितांना नुकसान भरपाई म्हणुन तत्काळ १ कोटी रुपय देण्यात यावी अशी मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली.
तसेच पीडितांना न्याय देण्यासाठी कायदेशीर लढाई तसेच वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र लीगल अध्यक्ष अँड तौसीफ शेख, सचिव. अँड क्रांती सहाने, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख, अँड सूरज जाधव, अँड रविंद्र आरू, आय टी शेख, अब्दुल अजीज शेख , अँड मुन्ना शेख, सादिक शेख यांच्यासहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.