संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपा महायुती चे ९ च्या ९ उमेदवार विजयी झाले, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनीती यशस्वी ठरली, महाविकास आघाडी च्या काही आमदारांनी महायुतीला पाठींबा दर्शविला,या ९ उमेदवारां पैकी देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय अशी ओळख असणारे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे यांचा विजय झाला.
या विजयी प्रसंगी पिंपरी चिंचवड भाजपा व अमित गोरखे मित्र परिवाराच्या वतीने भव्य विजयी रॅली काढण्यात आली,या रॅलीचे नियोजन पिंपरी विधानसभा क्षेत्रातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक भक्ती शक्ति चौक ते दापोडी,पिंपरी,मोरवाडी,संभाजीनगर शाहूनगर,थरमॅक्स चौक येथे करण्यात आला.या विजया बरोबर अमित गोरखे यांच्या रुपाने पिंपरी चिंचवड शहराला भाजपाचे ४ थे आमदार मिळाले,या अभूतपूर्व रॅली मध्ये भाजपा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकरभाऊ जगताप,भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे,पिंपरी चिंचवड मनपा माजी महापौर माई ढोरे, प्रदेश भाजपा युवा मोर्चा सचिव अनुप मोरे , सरचिटणीस शितल शिंदे,नगरसेविका अनुराधा गोरखे,पिंपरी-चिंचवड भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष तुषार हिंगे,मा.नगरसेविका सौ कमलताई घोलप,बापू घोलप,उत्तम केंदळे दक्षिण भारतीय आघाडीचे अध्यक्ष राजेश पिल्ले,पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ सुजाता पालांडे, पिंपरी चिंचवड भाजपा ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष सौ रोहिणी रासकर,श्री निलेश अष्टेकर,राजेंद्र बाबर,कैलास कुटे,अतुल इनामदार, गणेश लंगोटे,देवदत्त लांडे ,प्रकाश तात्या जवळकर,रघुनाथ जवळकर, प्रतिभा जवळकर,स्वीकृत नगरसेवक संजय कणसे,माजी नगरसेवक राजू दुर्गे,स्वीकृत नगरसेविका वैशाली खाडे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप,संदीपान झोंबाडे, शिवाजी साळवे,राजू आवळे,राहुल खुडे,आनंद शिंदे,सागर फुगे निलेश अष्टेकर,मंगेश घाडगे ,महेंद्र बाविस्कर राहुल खाडे,सुरेश गदिया, विशाल वाळुंजकर,गणेश वाळुंजकर,जयेश चौधरी,मनू जेठवणी,गोपी आस्वानी, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे,शिवसेना नेते विश्वजीत बारणे,तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व शहरातील पदाधिकारी या रॅलीला उपस्थित होते.
तसेच या रॅलीला महाराष्ट्रातुन तमाम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी शहरात ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हार घालून जीसीपी ने फुले टाकून अमित गोरखे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना अमित गोरखे म्हणाले म्हणाले “भविष्यात सर्व समाजासाठी सेवा करण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेल, महाराष्ट्रात लवकरच दौऱ्याचं आयोजन केले जाईल व महाराष्ट्रातील खास करून अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष काम करण्याचा माझा प्रयत्न असेल शिक्षणाला धरून प्रगती अद्यास ठेवून मी काम करेल”.
रॅलीला विविध संघटना त्याचबरोबर डॉ असोसिएशन जैन समाज प्रकाश मुस्लिम आघाडी व विविध सामाजिक संस्थांनी येऊन अमित गोरखे यांचा सन्मान केला.