संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
आज “भारतीय जनता पार्टी” पिंपरी चिंचवड प्राधिकरण,चिंचवड स्टेशन मंडळाच्या वतीने निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात राष्ट्रपतीपदी एन डी ए च्या उमेदवार श्रीमती द्रोपदी मुर्मी या भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल जल्लोषात त्यांचे अभिनंदन करण्यात आले, त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव श्री अमित गोरखे म्हणाले “जनसंघापासून सुरुवात झालेल्या भाजपाने खऱ्या अर्थाने एकात्म मानव वाद व समरसता याचा अनोखा समतोल राखत आदिवासी समाजातील महिलेला देशाच्या उच्च पदावर बसविलेले आहे, श्रीमती द्रोपदी यांचा इतिहास खरोखर प्रेरणादायी असून प्रत्येकाने तो वाचला पाहिजे, वैयक्तिक जीवनात दोन्ही मुलांचे अपघाती मृत्यू तथा पतीचे निधन यामुळे त्या खचल्या नाहीत ,एका साध्या शाळेत शिक्षकी पेशा पत्करून त्यांनी त्यांचे कार्य चालू केले ,तदनंतर राज्यपाल तथा राष्ट्रपती पदापर्यंत त्या पोहोचल्या अतिशय दुर्गम भागातील एक महिला उच्च पदावर विराजमान आहे ,हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे यश आहे… कुणालाही अपेक्षित नसलेले नाव भारतीय जनता पार्टीने द्रौपदीजींच्या नावाने पुढे आणले व आज त्या राष्ट्रपती म्हणून बहुसंख्य मतांनी निवडून आल्या आहेत हा संपूर्ण भारतातील महिलांचा व दुर्गम जमातीतील सर्व नागरिकांचा बहुमान आहे.
याप्रसंगी माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेविका अनुराधा गो रखे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सुप्रिया चांदगुडे ,श्री विजय शंकर ,राजेंद्र बाबर, प्रतीक बेंद्रे ,सलीम शिकलगार मनोज देशमुख ,माजी महापौर आर एस कुमार ,सूर्यकांत मोहिते, सचिन कुलकर्णी कमलेश बहारवाल सौ कोमल शिंदे राधिका बोरलीकर, सौ दिपाली धानोरकर ,सौ दिपाली कारंजकर ,सौ मीनल दीक्षित समीर जवळकर, शंकरराव किल्लेदार, यशवंत दनाने, मुकेश भाई चुडासामा ,चंद्रकांत धर्माधिकारी ,प्रकाश शिंदे ,सुरेश कारंडे , Shri भिंगारकर ,जनार्दन पोलखडे अरुण पाटोळे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना पेढे भरून जल्लोष करण्यात आला.