संवाददाता ब्रिजेश बडग़ुजर: वाकड.मानवाधिकार संरक्षण संघटना या संघटनेच्या पिंपरी चिंचवड जनसंपर्क कार्यालय व संघटनेच्या नाम फलकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम श्रीकृष्ण कॉलनी वाकड या ठिकाणी पार पडला,यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर,राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव नवघन,राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत,राष्ट्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दिलीप टेकाळे, सहसचिव महाराष्ट्र राज्य मुनीर शेख, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लक्ष्मण दवणे,अध्यक्ष पुणे जिल्हा ओंकार शेरे,महासचिव पुणे जिल्हा अविनाश रानवडे,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य योगेश म्हस्के,कार्याध्यक्ष पुणे जिल्हा संजय कांबळे,सहसचिव पुणे जिल्हा बाबासाहेब गायकवाड, युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर अभिजीत टेकाळे,यासह नवनिर्वाचित पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संदीप कोरी यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विविध दैनिकांचे आणि पोर्टलचे पत्रकार मित्र उपस्थित होते .यापैकी दैनिक पवना समाचारचे पत्रकार विजय भुसारे, संतोष शिंदे दैनिक पुढारी,त्याचप्रमाणे बापूसाहेब गोरे संस्थापक पिंपरी चिंचवड पत्रकार संघ, संघटनेचे अध्यक्ष दादाराव आढाव ,भारतीय जनमत टीव्हीचे उपसंपादक ब्रिजेश बडगुजर स्वराज्य रक्षक न्यूज चॅनेल चे संपादक प्रा सोमराज नाडे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना देखील नियुक्तीपत्र व ओळखपत्र यांचे वाटप करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमात परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय कोषाध्यक्ष रामराव नवघन यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कठारे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मानव अधिकार संरक्षण संघटनेचे तत्वे उद्दिष्ट समजावून सांगितली व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात गणेश पवार, मोहम्मद मुजमल, ज्ञानेश्वर उदाबले, , शंकर सातपुते, सुरेंद्र विश्वकर्मा ,धर्मेंद्र विश्वकर्मा ,गोल्डन सतीशचंद्र मिश्रा, अरविंद देसाई प्रजापती, सर्वात सिंग, प्रफुल मोरे, रवींद्रनाथ विश्वकर्मा, मुकीम खान, रामायण विश्वकर्मा, नंदिनी भुजबळ, महादेव दळवी, फैजान शेख, अभिजीत दिलीप टेकाळे, प्रसाद सोनवणे, संकेत शिंदे, आकाश जाधव, युवराज निर्मल, सोमा रोडे ,नाथा शिंदे, गौरव दिवटे, गोविंद परिहार, मुकेश राठोड, सुरज जगताप, विक्रांत शिकरे, विनायक भूनयार, खिलारे साहेब, अमीर जुबेर खान ,जावेद खान ,अच्युत ठोंबरे त्याचप्रमाणे उद्योजक नितीन इंगवले, उद्योजक सुशील काळे, उद्योजक विनोद पाटील ज्येष्ठ उद्योगजक रामनिवास शर्मा जी मांडवगडे ,आदी मान्यवर यासह अनेक महिला भगिनी सदस्य पदाधिकारी त्याचप्रमाणे सुमन संदीप कोरी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सोमराज नाडे यांनी केलं.