रेशन वाटपात घोळ करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करा, “छावा मराठा युवा महासंघ”

WhatsApp Image 2024-08-22 at 23.14.44_76f42bdc

संवाददाता ब्रिजेश बडगुजर:

(पिंपरी चिंचवड़) सर्व सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पुरवठा प्रशासन विरोधात,”छावा मराठा युवा महासंघ” संघटनेच्या वतीने धनाजी येळकर पाटील यांच्या नेतृत्वात पुरवठा अधिकारी कार्यालय निगडी येथे
“जवाब दो” आंदोलन करण्यात आले.*

यावेळी अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी सांगितले की,

1)स्वस्त धान्य दुकानदार यंचेकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन मध्ये घोटाळा होत असल्याचे निदर्शनास आल्याने,तसेच रेशन पावती दिली जात नसल्याने अशा दुकानदारांवर कारवाई करून त्यांना काळया यादीत टाकण्यात यावे.

WhatsApp Image 2024-08-22 at 23.14.44_a8e3f9c1

2) नवीन रेशन कार्ड,नावात बदल,नवीन नाव यासाठी दिरंगाई न करता ही कामे वेळेत करून नागरिकांचा त्रास कमी करावा.
यावेळी छावा मराठा युवा महासंघ अध्यक्ष धनाजी येळकर पाटील , मौलाना अब्दुल गफार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.